ऋषभ पंतवर लागणार 50 कोटी रुपयांची बोली? आयपीएल 2025 पूर्वी या दिग्गज खेळाडूने सांगितलं की..Wicketkeeper_Rishabh_Pan

Wicketkeeper_Rishabh_Pan आयपीएल 2025 स्पर्धेच्या मेगा लिलावात दिग्गज खेळाडू ऋषभ पंत दिसणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्याला रिटेन केलं नाही. असं असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटूने पंतबाबत एक भाकीत वर्तवलं आहे. मेगा लिलावात पंतला 50 कोटी मिळण्याची शक्यता आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी 10 फ्रेंचायझींनी 47 खेळाडूंना रिटेन केलं आहे. पण स्टार विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत या यादीत नाही. त्यामुळे त्याच्यावर दिल्ली सोडून इतर फ्रेंचायझींचा नजरा लागून आहेत. ऋषभ पंतला संघात घेण्यासाठी 9 संघांना मोठी बोली बोलावी लागणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने जबरदस्त खेळी करत फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे. त्यामुळे पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू प्रभावित झाला आहे.

पाकिस्तानचा माजी खेळाडू बासित अलीने ऋषभ पंतचं कौतुक केलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध मुंबईत कसोटीच्या दोन्ही डावात पंतची बॅट चालली. बासित अलीच्या मते ऋषभ पंतला संघात घेण्यासाठी लिलावात चढाओढ दिसेल. त्याला 50 कोटींची रक्कमही मिळू शकते.

बासित अलीने ऋषभ पंतचं कौतुक करताना सांगितलं की, ‘ऋषभ पंतने पहिल्या डावात 60 आणि दुसऱ्या डावात 64 धावा केल्या आहेत. या खेळाडूबाबत मी काय बोलू. लोकांच्या मते तो 25 कोटींच्या लायक आहे. पण मला वाटते की त्याला 50 कोटी मिळायला हवेत.’

बासित अलीने सांगितलं, ‘अशा पद्धतीच्या खेळपट्टीवर फलंदाजी करताना वाटत होतं की पाटा विकेटवर खेळत आहे. त्याला हवं तिथे तो मारत होता. पण शॉट निवडतानाही त्याची हुशारी दिसत होती. त्याला माहिती होतं की ज्या भागात शॉट खेळायचं नाही जिथे आपली बाजू कमकुवत आहे. बाकी खेळाडू असं करण्यात अयशस्वी ठरले.’

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत पंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. ऋषभ पंत तीन कसोटीच्या 6 डावात 43.50 च्या सरासरीने 261 धावा केल्या. यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे. पण टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. (PHOTO- PTI)

Leave a Comment