जरांगेसारखाच पॅटर्न अमेरिकेच्या निवडणुकीत?, ट्रम्प यांनी बांधली ‘या’ तीन समुदायांच्या मतांची मोट; दावा किती पक्का?

Donald Trump Jarange Pattern Us Election : तर मंडळी जरांगे पॅटर्नची ख्याती केवळ महाराष्ट्र वा देशापुरती मर्यादीत राहिलेली नाही, याठिकाणी. तर आता अमेरिकेमधील निवडणुकीत सुद्धा आपले ट्रम्प तात्या जणू असाच एक पॅटर्न राबवण्याच्या तयारीत आहे. मराठा, मुस्लीम आणि दलित हा MMD पॅटर्न चर्चेत आला आहे, तसा अमेरिकेत ट्रम्प यांनी सुद्धा एक खेळी खेळली आहे.

अमेरिकेत परवा म्हणजे 5 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा बार उडणार आहे. या दिवशी मतदान होईल. आता निवडणुकीतील प्रचाराचा अंतिम टप्पा जवळ आला आहे. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रॅम्प यांच्यात चांगली चुरस दिसत आहे. अंतिम टप्प्यात अधिकाधिक मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी दोघांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. दोन्ही उमेदवारांनी त्यांना व्हाईट हाऊसमध्ये पाठवण्याचे आणि समर्थन देण्याचे आवाहन केले आहे. या निवडणुकीच्या टप्प्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. महिला पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष होईल की ट्रम्प तात्या पुन्हा निवडून येतील यावर तिथं खल सुरू आहे. तर भारताच्या चष्म्यातून तिथं अजून एक पॅटर्न राबवण्यात येत आहे. जरांगे पॅटर्नप्रमाणेच ट्रम्प यांनी तिथे एक कार्ड खेळलं आहे.

जरांगे पॅटर्नची चर्चा

राज्यात गेल्या एक वर्षांपासून मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाने राजकारणाची दिशा बदलून टाकली आहे. लोकसभेत जरांगे, मराठा फॅक्टरने मोठा उलटफेर केला. डब्बल, ट्रिपल इंजिन सरकार असताना जरांगे पॅटर्नने सत्ताधाऱ्यांना हाबाडा दिला. आता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा, मुस्लीम आणि दलित हा MMD पॅटर्न राज्यात उतरवण्याचा निर्धार केला आहे. येत्या विधानसभेत हा पॅटर्न कुणाला दामटावतोय आणि कुणाचं डिपॉझिट जप्त करतो हे कळेलच. पण जरांगे पॅटर्न प्रमाणेच ट्रम्प यांनी पण तीन समुदायांची मोट बांधण्याचा पॅटर्न आणला आहे आणि त्याने मोठी चर्चा घडवली आहे.

हे सुद्धा वाचा
Image
Ajit Pawar : आमचं भविष्य ज्योतिषाकडं…, बारामतीमधील त्या बॅनरची राज्यात चर्चा; अजितदादांनी असा खुलला चेहरा
Image
Gulabrao Patil : आता पैलवान उतरला त्यामुळे समोर कोणीही पैलवान आला तरी त्याला कुस्ती खेळायची आहे
Image
Nandurbar Accident : भरधाव वाहनानं 3 दुचाकींना चिरडले, दिवाळीत 5 जणांवर काळाचा घाला, अपघाताने गावावर शोककळा
Gold Silver Rate Today 3 November 2024 : लाडक्या बहि‍णींची ‘दिवाळी’; सोन्याची फटफजिती, चांदीची सावध चाल, किंमतीत मोठी घसरण, भाव तरी काय?

मिशिगनच्या मतदारांचे वळवले मन

अमेरिकेच्या निवडणुकीत मिशिगन हे एक महत्त्वाचे राज्य आहे. येथे परंपरागत भारतीय वंशाचे, मुस्लिम आणि आफ्रिकन वंशीय अमेरिकन आहेत. ते डेमोक्रेटीक पक्षाचे समर्थक आहेत. पण यावेळी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यावर जादू केली आहे. त्यांचे मन आणि मत परिवर्तन झाल्याचे दिसून येते. हा तीनही वर्ग अचानक रिपब्लिकनच्या पाठीशी उभा ठाकला आहे. हा बदल येथील निवडणुकीचे वारे कोणत्या दिशेने धावत आहे, याचे प्रतिक मानण्यात येत आहे. जगाची ऑटो राजधानी, डेट्रायट हे महानगर मिशिगन राज्याची अर्थव्यवस्था सांभाळते. येथील कारखाने अनेक जणांच्या हाताला काम देतात. या महानगरात मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोकसंख्या आहे. याशिवाय भारतीय वंशाच्या लोकांची मोठी लोकसंख्या आहे. या बदलाने डेमोक्रेटिक पक्षाची डोकेदुखी वाढवली आहे.

कमला हॅरीस भारतीय वंशाच्या, पण…

डेमोक्रेटिक पक्षाच्या कमला हॅरीस या भारतीय वंशाच्या असल्या तरी मिशीगनमधील भारतीय वंशांचे लोक ट्रम्प यांच्या पाठीशी उभे ठाकल्याचे चित्र दिसत आहे. कमला हॅरिस या भारतीय, आफ्रिकन समाजाची सांस्कृतिक दृष्ट्‍या जोडल्या गेलेल्या आहेत. पण यंदा चित्र वेगळं आहे. ट्रम्प यांनी या तीनही समुदायाची चांगलीच मोट बांधल्याचे दिसून येते. येथील अनेक भारतीय वंशाच्या उद्योजक, कर्मचाऱ्यांनी उघडपणे ट्रम्प यांच्या बाजूने नारे दिले आहेत. कमला हॅरिस यांनी गेल्या काही वर्षात या समुदायाकडे दुर्लक्ष केल्याचा फटका त्यांना बसू शकतो, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

या सात राज्यात कुणाचा होणार खेला?

272towin.com नुसार हॅरिस यांनी 226 इलेक्ट्रोरल कॉलेज मत तर ट्रम्प यांना 219 मतं मिळाली आहेत. हॅरिस यांना 272 मतांची बिदागी हवी आहे. त्या अजून 44 मते दूर आहेत. तर ट्रम्प यांना 51 मतांची गरज आहे. एरिजोना, जॉर्जिया, मिशिगन, नेवादा, उत्तरी कॅरोलविना, पेन्सिल्वेनिया आणि विस्कॉन्सिन या सात राज्यात ज्यांचे पारडे जड असेल त्यांच्यासाठी व्हाईट हाऊसचा रस्ता प्रशस्त होईल. या राज्यांना स्विंग स्टेट म्हणतात. ट्रम्प या ठिकाणीच जरांगे सारखा पॅर्टन राबवत आहेत.

Leave a Comment