Pune Crime : पुढे तरुणी दिसताच दारुड्यांमधला राक्षस जागा झाला, मामेभावासमोरच टाकला हात, चाकू दाखवून सोनंही लुटलं; बलात्काराच्या घटनेनं पुणे सुन्न!

Pune Crime:स्वारगेट बस स्थानकात (Swargate Bus Depot) 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यातून (Pune Crime) आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. शिरुर तालुक्यात युवती आणि तिचा मामेभाऊ रात्रीच्या वेळेस गप्पा मारत असताना दारु पिऊन आलेल्या दोघांनी युवतीवर अत्याचार केलाय.

ही घटना शिरुर तालुक्यातील कोरेगाव येथे घडलीये.

मामेभावासमोर तरुणीवर दोघांकडून आळीपाळीने अत्याचार

अधिकची माहिती अशी की, शिरुर तालुक्यात कारेगाव येथे एक युवती आणि तिचा मामेभाऊ रात्रीच्या वेळेस गप्पा मारत बसलेले असताना दारु पिऊन आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना चाकूचा धाक दाखवत लाथा बुक्क्यानी मारहाण केली. तसेच आळीपाळीने त्या युवतीवर बलात्कार करुन तिच्या अंगावरील सोनं काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये घडलाय. रांजणगाव पोलिसांनी तात्काळ त्या दोन नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत अमोल नारायण पोटे (वय 25) आणि किशोर रामभाऊ काळे (वय 29) अशी अटक केलेल्या दोन आरोपीची नावे आहेत.

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेची डीएनए चाचणी होणार

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याची आता डीएनए चाचणी केली जाणार आहे. चौकशी दरम्यान, दत्ता गाडेने मी समलैंगिक असल्याचा दावा देखील केला आहे. फलटणकडे निघालेल्या तरुणीला मी बसचा ड्रायव्हर आहे, ही बस फलटणहून सोलापूरला जाणार आहे, अशी चुकीची माहिती दिली. त्यानंतर तरुणी बसमध्ये चढल्यानंतर तिच्यावर अत्याचार केला, असा आरोप दत्ता गाडे याच्यावर आहे. दरम्यान, घटना घडल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना जवळपास 50 तास लागले होते. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता आरोपीला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Leave a Comment