Viral Video ही वाळा संपताच उन्हाळ्याच्या झळा जाणवायला लागतात, आणि एसी व पंख्यांची मागणी झपाट्याने वाढते. बाजारात सध्या हाय-टेक आणि आकर्षक डिझाइनचे सीलिंग फॅन उपलब्ध असून, त्यांचे अनोखे रूप पाहून लोक चकित होतात.
अनेकदा असे वाटते, हा पंखा आहे की काहीतरी वेगळं? लोकांच्या हौसेमुळे बाजारात विविध रेंज आणि डिझाइनचे पंखे येऊ लागले आहेत.
यामध्ये सध्या ‘हेलिकॉप्टर फॅन’ नावाचा विशेष पंखा चर्चेत आहे. त्याचा अनोखा आणि हेलिकॉप्टरच्या ब्लेडसारखा डिझाइन लोकांचे लक्ष वेधून घेतो. आधुनिक आणि आकर्षक पंख्यांच्या या प्रकारांमुळे उन्हाळ्यातील उष्णता कमी करताना घराचे सौंदर्यही वाढवण्याचा नवा ट्रेंड पाहायला मिळतो. हेलिकॉप्टरच्या डिझाइनसारख्या अनोख्या सीलिंग फॅनचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हा पंखा पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत, कारण तो खरोखर सीलिंग फॅन आहे की हेलिकॉप्टरचा भाग, असा प्रश्न सर्वांनाच पडतो.
आकर्षक डिझाइनमुळे तो लोकांचे लक्ष वेधत असून, अशा अनोख्या पंख्यांची मागणीही वाढत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि डिझाइनच्या या मिश्रणाने पंख्यांना नवा आयाम दिला आहे. इन्स्टाग्राम हँडल ‘@amera_q8_2016’ वर पोस्ट केलेल्या हेलिकॉप्टर डिझाइनच्या अनोख्या पंख्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 54 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 1.5 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
शेकडो लोकांनी या पंख्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट केली, “यालाच म्हणतात हेलिकॉप्टर फॅन!” दुसऱ्याने प्रश्न विचारला, “हे बनवलं तरी कुणी?” तर आणखी एका युजरने लिहिलं, “खूपच क्रिएटिव्ह आणि कूल डिझाइन आहे!” या पंख्याच्या अनोख्या डिझाइनने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.