Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment महिलांनो लक्ष द्या! लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता `या` दिवशी बँक खात्यात जमा होणार

Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment: रक्षाबंधनाच्या आधीच लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन महिलांच्या बँक खात्यात जमा झाले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे मानधन कधी जमा होणार असा प्रश्न अर्जदार महिलांना सतावत होता. आता लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता कधी बँक खात्यात जमा होणार याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम रायगडमध्ये होत आहे. 29 सप्टेंबर रोजी तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम होत आहे. त्याचदिवशी म्हणजे 29 सप्टेंबर रोजी महिलांच्या खात्यात तिसरा हफ्ता जमा होणार आहे. सप्टेंबरपर्यंत आलेल अर्ज यांचे लाभ वितरित करण्यात येतील. या योजनेमुळं 2 कोटी महिलांना लाभ दिले जाणार आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. 29 सप्टेंबर रोजी महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत.

Leave a Comment