झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील एका गावात लग्नाच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली. दारूच्या नशेत असलेल्या वराने असं काही केलं की वधूने थेट लग्न करण्यास नकार दिला. असं काय घडलं?
झारखंडमधील बरदरी गावात एक अनोखा आणि आश्चर्यकारक लग्नाचा प्रकार घडला आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे. बरदरी येथील रहिवासी देवव्रत कुमार आपल्या विवाहासाठी सुमारे 50 लोकांसह गेला होता. घरात आनंदाचे वातावरण होते. पण जेव्हा वर मंडपात पोहोचला, तेव्हा त्याने असे कांड केला की सर्वजण अवाक झाले. आता नेमकं काय झालं? चला जाणून घ्या…
हा प्रकार झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील चैनपूर पोलीस स्टेशन क्षेत्रातील निमिया गावाचा आहे. येथील रहिवासी देवव्रत कुमारचा विवाह बरदरी गावातील एका सुंदर मुलीशी ठरला होता. वर मोठ्या थाटामाटात बारात घेऊन वधूच्या घरी गेला. या दरम्यान देवव्रत आणि त्याचे मित्र आनंदात दारू पित राहिले. जेव्हा वरात मुलीच्या घरी पोहोचली, तेव्हा वर दारूचा नशेत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. वरमाला घालून देवव्रत आपल्या मित्रांसह पुन्हा जवळपास दोन तास दारू पित राहिला.
गळ्यातला हार फेकला आणि मग…
विवाहाचे विधी सुरू झाले, महिला गाणी गात होत्या आणि वातावरण आनंदी होते. पण वर, जो पूर्णपणे नशेत होता, मंडपात पोहोचला आणि शिवीगाळ करू लागला. त्याने गळ्यातली माळ फेकली आणि मग तो तिथेच बेशुद्ध होऊन झोपला. वरात्यांनी गावात सुमारे आठ तास वाट पाहिली. सकाळी जेव्हा वराची झोप उघडली आणि नशा उतरू लागली, तेव्हा वधूने स्पष्ट सांगितले की ती त्याच्याशी लग्न करणार नाही.
वधू पक्षाची रक्कम परत करण्याची मागणी
वधू पक्षाने वरात्यांना दोन लाख रुपये रोख, एक लाख 54 हजार रुपयांची अपाची बाइक, फ्रिज-कूलर यासह एकूण 5 लाख 84 हजार रुपये हुंडा दिला होता. विवाह मोडल्यामुळे वधू पक्षाने संपूर्ण रक्कम परत करण्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण न केल्यास वधू पक्षाने वरात्यांना गावा बाहेर जाऊ देणार नाही अशी अट घातली.
पोलिसांनी प्रकरण सोडवले
हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले तेव्हा पोलिसांनी दोन्ही पक्षांना बोलावून चर्चा केली. पोलिसांसमोरही वधूने दारुड्या वराशी लग्न करण्यास नकार दिला. शेवटी, 15 दिवसांच्या आत वराच्या पक्षाने हुंड्याची रक्कम आणि इतर सामान देण्याचे वचन दिले. त्यानंतरच वर आणि त्याच्या वरात्यांना गावाबाहेर जाण्याची परवानगी मिळाली.