बाईSS. काय हा प्रकार”; भरट्रॅफिकमध्ये तरुणीनं केलेलं कृत्य पाहून नेटकरी चक्रावले; viral VIDEO पाहून तुम्हीही माराल कपाळावर हात.
Traffic Viral Video : सोशल मीडियावर रोज लोकांना हसवणारे त्यांचे मनोरंजन करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण, त्यात काही वेळा असे काही व्हिडीओ समोर येतात; जे पाहिल्यानंतर आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही.
सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही कपाळावर हात माराल. व्हिडीओमध्ये एक तरुणी भरट्रॅफिकमध्ये असे काही कृत्य करताना दिसत आहे की, जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. व्हिडीओमध्ये या तरुणीने नेमके काय केले ते जाणून घेऊ…
तरुणी ट्रॅफिकमध्ये पाळतेय वाहनांसाठी असलेले नियम (Girl Follow Cars Traffic Rules Viral Video)
तुम्ही जेव्हा कधी रस्त्यावर जाता, तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की, खूप ट्रॅफिक असते तेव्हा कारचालक ज्या लाइनमध्ये ते आहेत, ती लाइन मोकळी होण्याची वाट पाहत असतात. पण, त्याच रस्त्यावरून चालणारे लोक ट्रॅफिकमधून जागा मिळेल, तसे भराभर चालत सुटतात. त्यांना वाहनांप्रमाणे काही नियम वगैरे पाळावे लागत नाहीत. पण, व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणी ट्रॅफिकमध्ये वाहनांसाठी असलेले नियम पाळताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये वाहनांच्या रांगेत उभी आहे. जेव्हा तिच्यापुढे चालणारे वाहन थांबते तेव्हा ही तरुणीदेखील थांबते आणि जेव्हा वाहने पुढे जाते तेव्हा तीही पुढे जाऊ लागते. हे दृश्य पाहून तरुणीच्या मागे असलेल्या कारमधील एका व्यक्तीने तिचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला; जो सध्या खूप व्हायरल होत आहे. पण, ही तरुणी असे का वागतेय हे काही समोर आले नाही.
भाऊ, तिचं डोकं नीट ठिकाणावर नाही’, तरुणीच्या व्हिडीओवर युजरची कमेंट
‘ही ताई स्वत:ला कार समजत होती वाटतं. पापा की परी.’ हा व्हिडीओ आतापर्यंत अनेकांनी पाहिला असून, त्यावर युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय की, अगदी बरोबर भाऊ. दुसऱ्या युजरने लिहिलेय की, व्वा, व्वा, क्या बात है. तिसऱ्या युजरने लिहिलेय की, वाह ताई वाह. शेवटी एका युजरने लिहिलेय की, भाऊ, तिचं डोकं नीट ठिकाणावर नाही, असं वाटलं.