अरेरे! कल्याण रेल्वेस्थानकावर स्पायडरमॅन मागतोय भीक, VIRAL VIDEO

अरेरे! कल्याण रेल्वेस्थानकावर स्पायडरमॅन मागतोय भीक, VIRAL VIDEO

Spiderman begging at kalyan railway station video viral: स्पायडरमॅन या सुपरहिरोबद्दल अगदी लहानपणापासून सगळ्यांनी ऐकलंच असेल. या स्पायडरमॅनचे अनेक कार्टून, चित्रपट पाहत अनेक जण मोठे झाले आहेत.

आता त्याची लोकप्रियता वाढून नव्या पिढीलाही त्याचं वेड लागलं आहे.

लहानपणापासून अनेकांच्या घरात खेळणं म्हणून किंवा सॉफ्ट टॉय म्हणून असलेला स्पायडरमॅन तुम्ही समोर पाहिला तर तुम्हाला किती आनंद होईल. नक्कीच सगळ्यांना त्याची सुपरपॉवर जाणून घ्यायची इच्छा होईल. अनेक जण त्याच्याबरोबर सेल्फीही काढतील.

पण, जर तोच स्पायडरमॅन तुम्हाला एका रेल्वेस्थानकाबाहेर भीक मागताना दिसला तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? सध्या सोशल मीडियावर एका अशाच स्पायडरमॅनची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यात स्पायडरमॅनच्या वेशात असलेला एक तरुण रेल्वेस्थानकाबाहेर भीक मागताना दिसतोय.

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये स्पायडरमॅनच्या वेशात असणारा एक इसम चक्क कल्याण रेल्वेस्थानकाच्या बाहेर बसून भीक मागताना दिसतोय. भीक मागत असताना एक माणूस त्याची मदत म्हणून त्याच्या हातात काही पैसे ठेवतो. सुपरहिरोचा पोशाख घालून भीक मागण्याचा हा प्रकार खराखुरा नसून फक्त एका रीलसाठी करण्यात आला होता.

 

Leave a Comment