Untitled-design मथुरेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
असं म्हणतात भक्तीमध्ये प्रचंड शक्ती असते. त्यामुळेच हजारो भक्त आपली समस्या घेऊन देवाच्या दारात मंदिरात जाताता. काही क्षणासाठी का होत नाही पण त्यांच्या मनाला ईश्वराचं दर्शन केल्यानंतर शांती मिळते. मथुरा- वृंदावनबाबत बोलायचं झाल्यास इथे प्रत्येक गल्लीमध्ये मंदिर आहे. जिथे भक्त दर्शन घेण्यासाठी रांग लावतात. मात्र नुकताच मथुरेचा एक व्हिडीओ व्हायरल (Vrindavan Temple Viral Video) झाला आहे. या व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे.व्हायरल व्हिडीओमध्ये भक्त देवाच्या दर्शनानंतर मंदिराच्या भींतीला असलेल्या एका जल स्त्रोतातून येणारं पाणी तीर्थ म्हणून प्राशन करताना दिसत आहेत. मात्र भक्त जे पाणी ईश्वराचं चरणामृत म्हणून पीत होते, ते तीर्थ नसून भलताच प्रकार निघाला, त्यामुळे भक्तांनी संताप व्यक्त केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ मथुरेच्या बांके बिहारी मंदिरातील आहे. एका हत्तीच्या मूर्तीच्या सोंडेतून टपकणारं पाणी तीर्थ म्हणून घेण्यासाठी भक्त रांगेत उभे आहेत. काही लोक चमच्यामध्ये तर काही लोक आपल्या हातामध्ये हे पाणी घेऊन तीर्थ म्हणून ते पिताना या व्हिडीओमध्ये दिसून येत. हे पवित्र तीर्थ असल्याचं लोकांना वाटत होतं. मात्र सत्य समोर येताच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये येणाऱ्या मुलाचा आवाजातून हे कळतं की या हत्तीच्या सोंडेतून टपकणार पाणी तीर्थ नसून एसीमधून निघणारं पाणी आहे.एवढंच नाही तर या मंदिरात असलेल्या पुजाऱ्यांकडून देखील या गोष्टीला दुजोरा देण्यात आला आहे की हे पाणी तीर्थ नसून एसीमधून निघणारं पाणी आहे.ज्या व्यक्तीनं हा व्हिडीओ बनवला त्यानेच भक्तांना सांगितलं की ते जे पीत आहेत ते तीर्थ नसून एसीमधून निघणार पाणी आहे.
असं पाणी पीणं धोकादायक
एसीमधून निघणार पाणी हे हवेमुळे जमा होतं. ज्यामध्ये धूळ आणि इतर वायुजन्य प्रदूषक असतात.एसीमुळे हवेत एकप्रकारचा ओलावा निर्माण होतो. ही स्थिती बॅक्टेरिया, बुरशी यांच्यासाठी अनुकूल असते. त्यामुळे तुम्ही जर एसीमधून निघणार पाणी अधिक काळापासून पीत असाल तर त्यामुळे तुम्हाला मायक्रोबियल ग्रोथ नावाचा आजार होऊ शकतो. ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, अशा लोकांसाठी ही स्थिती धोकायदायक असते.