IND vs SA : संजू सॅमसन इतिहास घडवण्यापासून 59 धावा दूर, धोनी-रोहितच्या यादीत एन्ट्री मिळवण्याची संधी sanju-samson-team-india

India vs South Africa T20i Series Sanju Samson : संजू सॅमसन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक खास कामगिरी करण्यापासून 59 धावा दूर आहे.

sanju-samson-team-india

टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. उभयसंघात एकूण 4 सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेतील सलामीचा सामना हा 8 नोव्हेंबरला होणार आहे. एडन मारक्रम दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. टीम इंडिया या मालिकेसाठी सोमवारी 4 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेत पोहचून सरावालाही लागली आहे. या मालिकेत टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन याला खास कारनामा करण्याची संधी आहे.

संजू सॅमसन याला टी 20 क्रिकेटमध्ये 7 हजार धावांचा टप्पा पार करण्याची संधी आहे. संजूला 7 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 59 धावांची गरज आहे. भारताकडून आतापर्यंत एकूण 9 जणांनी टी 20 क्रिकेटमध्ये 7 हजार धावा केल्या आहेत. आतापर्यंत रोहित शर्मा, शिखर धवन, सुरेश रैना, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक आणि रॉबिन उथप्पा या 9 फलंजदाजांनी ही कामगिरी केली आहे. तर संजू सॅमसन याने आतापर्यंत 281 टी 20 सामन्यांमध्ये 6 हजार 941 धावा केल्या आहेत.

दरम्यान संजू समॅसन याने शेवटच्या टी 20i सामन्यात विस्फोटक खेळी केली होती. टीम इंडियाने मायदेशात बांगलादेश विरुद्ध टी 20i मालिका खेळली. या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात संजूने शतकी खेळी केली होती. संजूने 47 बॉलमध्ये 111 धावा केल्या होत्या. त्यामुळे संजूकडून आता अपेक्षा वाढल्या आहेत. तसेच तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कशी कामगिरी करतो? याकडेही साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, अवेश खान आणि यश दयाल.

T20I सीरिजसाठी दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम (कॅप्टन), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना, न्काबा पीटर, रायन सिमलेटन, रायन रिकेल लुथो सिपमला (तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी) आणि ट्रिस्टन स्टब्स.

Leave a Comment