Salman Khan – Lawrence Bishnoi : सलमान खान याची हत्या करण्यासाठी लॉरेन्स बिश्नाई गँगने अनेकदा धमकी दिली आहे. आताच नवी धमकी आली आहे. या गँगने भारतात बंदी असलेले पिस्तूल मागितले आहे. अतिक अहमद आणि सिद्धू मुसेवाला यांची हत्या या पिस्तूलाने करण्यात आली होती. कोणते आहे हे पिस्तूल, किती आहे त्याची किंमत?
मुंबईत सलमान खान याची हत्या करण्यासाठी कट रचल्याचे उघड झाले आहे. प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचा शूटर सुक्खा याला अटक करण्यात आल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. सुक्खाच्या दाव्यानुसार, सलमान खान याला मारण्यासाठी अत्याधुनिक शस्त्रे AK 47, AK 92, M 16 आणि तुर्कीत तयार झालेले जिगाना या तुर्की पिस्तूलाचा वापर करण्यात येणार आहे. या गँगने हे पिस्तूल खरेदी करण्याची योजना आखली आहे. अतिक अहमद आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्या याच पिस्तूलाने करण्यात आली आहे. टिसास ट्रॅबजेन आर्म्स इंडस्ट्री कॉर्प ही तुर्कीची कंपनी हे पिस्तूल तयार करते. गेल्या 23 वर्षांपासून ही कंपनी पिस्तूल तयार करत आहे.
केवळ सुरक्षा कंपन्यांनाच विक्री
जिगाना पिस्तूल ही मर्यादित वापरासाठी तयार करण्यात येते. ही पिस्तूल केवळ सुरक्षा कंपन्यांसाठी उत्पादित करण्यात येते. तुर्की सेना या पिस्तूलाचा वापर करते. ही पिस्तूल युरोपियन पिस्तूलाची कॉपी नसल्याचा कंपनीचा दावा आहे. भारतात या पिस्तूलावर बंदी आहे. पण तस्करांच्या मदतीने ही पिस्तूल भारतात आणल्या जाते. सलमान खान याची हत्या करण्यासाठी लॉरेन्स गँग पाकिस्तानमधील त्यांच्या हस्तकांमार्फत ही पिस्तूल मागवणार होती.
पिस्तूलाची किंमत किती?
Salman Khan – Lawrence Bishnoi
तुर्कीत तयार होणारी जिगाना पिस्तूल खरेदी करणे सर्वांनाच शक्य होत नाही. ही पिस्तूल 4 ते 7 लाख रुपयांच्या दरम्यान मिळते. जिगाना पिस्तूलासाठी बिश्नोई गँग 10-12 लाख रुपये देण्याच्या तयारीत आहे. दिल्लीतील टॉप गँगस्टर्स पण या पिस्तूलासाठी लाखो रुपये मोजायला तयार आहेत. काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई याने जितेंद्रर गोली याला ही पिस्तूल गिफ्ट दिली होती. ही पिस्तूल कधीच अडकत नाही, जाम होत नसल्याचा दावा करण्यात येतो. जिगाना पिस्तूलातून एकावेळी 15-17 राऊंड फायर केल्या जाऊ शकते. अनेक गँग खंडणीतील पैसा हे पिस्तूल खरेदीसाठी खर्च करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
मुलीच्या नावाने जिगाना पिस्तूल
नाटो संघटनेच्या गुणवत्तेनुसार ही पिस्तूल तयार करण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही कंपनी हलके आणि मोठी शस्त्रे तयार करते. कंपनीच्या दाव्यानुसार शस्त्रे गुणवत्तेनुसार आहेत की नाही याची तपासणी केल्याशिवाय ते बाहेर विक्री केल्या जात नाहीत. या पिस्तूलाची फायर कंट्रोल टेस्ट करण्यात येते. गुणवत्तेवर खरी उतरल्यावरच ही कंपनी त्याची विक्री करते. हंगेरी भाषेतील जिगाना या मुलीच्या नावावरून या पिस्तूलाला हे नाव देण्यात आले आहे. जिगानाचा अर्थ जिप्सी गर्ल असा होतो.