इराणी खाद्यपदार्थात मुख्यतः भात आणि मांस, तसेच भाज्या, दाणे यांचे मिश्रण असतं. मसाल्यात नेहमी कोरड्या वनस्पती, फळे यांचा वापर केला जातो. डाळिंब, दालचिनी, आप्रेकोट, पार्सेली या भाज्या आणि फळे वापरली जातात.एवढचं नाही तर सुके लिंबू,केशर आणि इतर थोडेसे आंबट चवीचे पदार्थ, दालचिनी यांचा सढळ वापर इराणी स्वयंपाकात केला जातो.