Gold Silver Rate Today 19 October 2024 चांदी सुस्तावली, तर सोन्याची जोरदार फटकेबाजी, तीनच दिवसात इतक्या वधारल्या किंमती, सणासुदीत ग्राहकांना फटका

Gold Silver Rate Today 19 October 2024 : चांदीत गेल्या काही दिवसांपासून मोठी उलाढाल नसली तरी सोन्याने जोरदार फटकेबाजी केली आहे. चांदीला थोडी धाप लागली आहे. सोने लवकरच 80,000 रुपयांच्या घरात तर चांदी एक लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. जळगाव सराफा बाजारात काल दोन्ही धातुनी ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले.

गेल्या काही दिवसांपासून चांदीचा सूर हरवला आहे. चांदी मोठी उडी घेण्यासाठी चाचपडत आहे. तर सोन्याने गेल्या काही दिवसांपासून दमदार बॅटिंग केली आहे. चांदीला थोडी धाप लागली आहे. सोने लवकरच 80,000 रुपयांच्या घरात तर चांदी एक लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. जळगाव सराफा बाजारात काल दोन्ही धातुनी ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले. सणासुदीत आणि निवडणुकीच्या धामधुमीत दोन्ही धातु मोठी मजल मारणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. आता सोने आणि चांदीची अशी आहे किंमत? (Gold Silver Price Today 18 October 2024 )

तीनच दिवसात सोन्याची मोठी झेप

दिवाळीपूर्वी सोने 80 हजारांच्या घरात जाते की काय अशी स्थिती आहे. जागतिक युद्धाचा परिणाम, चीनकडे गुंतवणूकदारांचा वळालेला मोर्चा आणि भारतीय बाजारपेठेत सणासुदीच्या तडक्यामुळे हा पिवळा धातु वधारला आहे. 15 ऑक्टोबर रोजी सोने 220 रुपयांनी स्वस्त झाले. 16 ऑक्टोबर रोजी सोने 490 रुपयांनी वधारले. 17 सप्टेंबर रोजी त्यात 220 रुपयांची भर पडली. तर आज सकाळच्या सत्रात ही या धातुची दमदार आगेकूच दिसत आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Leave a Comment