virel news कल्याण स्थानकाजवळ टिटवाळा-सीएसएमटी लोकलचा १२वा डब्बा रुळावरून घसरला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रेनचा वेग कमी असल्याने प्रवासी सुरक्षित आहेत. रेल्वे प्रशासनाने तातडीने काम सुरु केले आहे. मात्र, यामुळे कल्याण-टिटवाळा मार्गावरील लोकल सेवा ठप्प आहेत आणि मध्य रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.
टिटवाळा स्थानकातून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी 8. 35 बारा डब्ब्याची एक स्लो लोकल ट्रेन कल्याण स्थानकाजवळ अपघातग्रस्त झाली. या गाडीचा बारावा डब्बा रुळावरून घसरल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुर्घटना घडली नाही. स्थानकाजवळ असल्यामुळे ट्रेनचा वेग कमी होता, ज्यामुळे चालकाने त्वरित खबरदारी घेत गाडी जागेवरच थांबवली आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले.
रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या घटनेमुळे कल्याण स्थानकावरून टिटवाळ्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल ट्रेनसेवा ठप्प झाल्या आहेत. मध्य रेल्वेचे वेळापत्रक देखील उशिराने सुरू असल्याचे समजते.