Sonam Raghuvanshi Affair
हनीमूनसाठी घरापासून 2186 KM दूर अंतरावर जाणं राजा रघुवंशीला महाग पडलं. याची किंमत त्याला प्राण देऊन चुकवावी लागली. राजाला काश्मीरला जायचं होतं. पण पत्नी सोनम त्याला जबरदस्ती मेघायलला घेऊन गेली.
लग्नाला अजून एक महिनाही झाला नव्हता. त्याआधीच पती राजा रघुवंशीला संपवण्यात आलं. ते सुद्धा घरापासून 2186 किलोमीटर दूर नेऊन राजाला मारलं. राजा हनीमूनसाठी गेला होता. पण हा त्याच्यासाठी मृत्यूचा हनीमून बनला. 17 दिवसांपूर्वी राजा आणि त्याची पत्नी सोनम शिलॉन्गच्या जंगलातून गायब झाली. 2 जून रोजी राजाचा मृतदेह सापडला. या प्रकरणात आता इंदूर आणि मेघालय पोलिसांनी बऱ्यापैकी उलगडा केलाय. सोनम सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. तिचा बॉयफ्रेंड आणि सुपारी किलर्सना सुद्धा पोलिसांनी अटक केलीय.
राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणात ज्या लोकांना अटक केलीय, त्यात विक्की ठाकुर, आनंद आणि राज कुशवाह यांचा समावेश आहे. राजा कुशवाह या सगळ्या गुन्ह्यात मास्टरमाइंड असल्याच पोलीस तपासात समोर आलय. तो सतत सोनम रघुवंशीच्या संपर्कात होता. तो सोनमचा बॉयफ्रेंड आहे. पोलिसांनी कॉल डिटेल रेकॉर्डच्या (CDR) आधारावर ट्रेस करुन त्याला पकडलं.
राजावर सर्वात पहिला हल्ला आनंदने केला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजावर सर्वात पहिला हल्ला आनंदने केला. त्यानंतर अन्य दोन आरोपींनी गुन्हा प्रत्यक्षात आणला. या प्रकरणात गाजीपूर पोलिसांनी इंदूर पोलिसांना आवश्यक इनपुट दिले. सोनम रघुवंशीने नंदगंज पोलीस ठाण्यात सरेंडर केलं.
परतीच तिकीट तिने बुक केलं नव्हतं
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, मेघालयला जाण्याच तिकीट सोनमने बुक केलं होतं. पण परतीच तिकीट तिने बुक केलं नव्हतं. त्यामुळे राजा रघुवंशीला मार्गातून हटवण्याच प्लानिंग आधीच झाल्याचा संशय बळावतो.
अजूनही काही जणांना अटक होऊ शकते
राज कुशवाह आणि विक्की ठाकूर सध्या इंदूर पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यांची चौकशी सुरु आहे. तिसरा आरोपी आनंदला शिलॉन्ग पोलिसांनी मध्य प्रदेशच्या सागरमधून ताब्यात घेतलं व सोबत मेघालयला घेऊन गेले. तिन्ही आरोपींची भूमिका आणि कारस्थानाचा उलगडा करण्यासाठी पोलीस कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि अन्य टेक्निकल पुराव्यांची मदत घेत आहेत. पोलिसांनुसार अजूनही काही जणांना अटक होऊ शकते. कारस्थानात अजूनकही काही जण सहभागी असल्याचा संशय आहे.
सोनमसोबत त्याचे घनिष्ठ संबंध
सोनमच तिच्याच फॅक्टरीतील एक कर्मचारी राज कुशवाहसोबत प्रेमसंबंध होते. ही फॅक्टरी सोनमचे वडील देवी सिंह रघुवंशी यांच्या मालकीची आहे. तिथे सोनम एचआर म्हणून काम करायची. राज कुशवाह त्या फॅक्टरीत मॅनेजर म्हणून काम करायचा. सोनमसोबत त्याचे घनिष्ठ संबंध होते. सोनमच्या वडिलांनी सांगितलं की, घटनेच्या दोन दिवस आधीपर्यंत राज कुशवाह नियमित फॅक्टरीमध्ये येत होता.