हे लग्न तुमच्या आयुष्यभराची कमाई उडवेल, जाणून घ्या कसे? WhatsApp

नोव्हेंबर महिना सुरू असून केवळ लग्नाची निमंत्रणे येत आहेत. तुम्हालाही लग्नाचं आमंत्रण दिलं जातंय का? आजकाल लोक WhatsApp वर लग्नाचे कार्ड पाठवतात. ही पद्धत सोपीही आहे. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा लग्नाबद्दल सांगत आहोत. या लग्नामुळे तुमची आयुष्यभराची कमाई जाऊ शकते. जाणू घ्या.

भारतात लग्न समारंभ मोठ्या थाटामाटात केले जातात, हे तुम्हाला माहितीच आहे. तुमच्याकडे लग्नाचं कार्ड आलं की तुम्ही छान कपडे घालून लग्नाच्या ठिकाणी पोहोचता. पण एक लग्न असंही आहे जे तुमच्यासाठी जेवणाची मेजवानी होण्यापेक्षा धोक्याची मेजवानी ठरू शकतं. आपल्या लक्षात आले असेल की फसवे लोक आता WhatsApp वर लग्नाचे कार्ड पाठवून आपले बँक खाते खाली करण्याचा प्रयत्न करत आहेत. याविषयी जाणून घ्या.

आपण ज्या लग्नाबद्दल बोलत आहोत, ते मुळात होतच नाही. पण तुमची फसवणूक नक्कीच होऊ शकते. आजकाल सायबर गुन्हेगारांच्या फसवणुकीच्या नवनवीन पद्धती समोर येत आहेत. त्यांनी लग्नाला सायबर फसवणुकीची नवी युक्ती बनवली आहे. WhatsApp वर लग्नपत्रिका पाठवून फसवणूक केली जात असल्याचे नुकतेच समोर आले आहे.

WhatsApp वर फसवणूक कशी होते?

सायबर गुन्हेगार आता WhatsApp वर लग्नाच्या बनावट निमंत्रण पत्रिका पाठवून लोकांची फसवणूक करत आहेत. लग्नाचे कार्ड APK फाईल म्हणून येते. जेव्हा एखादी व्यक्ती ही फाईल डाऊनलोड करून इन्स्टॉल करते, तेव्हा आपण यात फसू शकतो. ओटीपी, मेसेज, बँकिंग अ‍ॅप्सची माहिती धोक्यात

या फाईल्स तुमच्या फोनमधील ओटीपी, मेसेज, कॉन्टॅक्ट्स आणि अगदी बँकिंग अ‍ॅप्सची माहिती चोरू शकतात. त्यामुळे बँक खात्यातून पैसे काढण्याचा धोकाही वाढतो.

फसवणूक कशी टाळावी?

लग्नाचे खरे आमंत्रण सहसा व्हिडिओ किंवा PDF फाईलच्या स्वरूपात येते. ती APK फाईलवर पाठवली जात नाही.

APK फाईल

लग्नाचे कार्ड APK फाईलमध्ये असेल तर ताबडतोब सावध व्हा. कोणीतरी आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत असल्याचे हे स्पष्ट लक्षण किंवा संकेत आहेत.

अनोळखी नंबरपासून सावध राहा

WhatsApp वर अनोळखी नंबरवरून लग्नाचं कार्ड येत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका. याशिवाय हा नंबर तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचा आहे की नाही, याचीही खातरजमा करू शकता.

आपल्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन ‘Unknown Sources’ मधून अॅप्स इन्स्टॉल करण्याचा पर्याय बंद करा. आपला फोन नेहमी अपडेट ठेवा. फोन अपडेट ठेवल्याने सायबर हल्ल्याचा धोका कमी होतो.

अशा प्रकारे काही लग्न तुमच्यासाठी जेवणाची मेजवानी होण्यापेक्षा धोक्याची मेजवानी ठरू शकतात. आपल्या लक्षात आले असेल की लोक आता WhatsApp वर लग्नाचे कार्ड पाठवू लागले आहेत आणि यातून हा फ्रॉड होत आहे. त्यामुळे WhatsApp वर अनोळखी नंबरवरून लग्नाचं कार्ड येत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका. याशिवाय हा नंबर तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचा आहे की नाही, याचीही खातरजमा करू शकता. त्याशिवाय कोणत्याही WhatsApp मेसेजमधील लग्नपत्रिकेला क्लिक करू नका.

Leave a Comment