VIREL NEWS:बदलापूर घटनेतील पीडितेच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवणाऱ्या तरुणीवर गुन्हा दाखल

VIREL NEWS

बदलापूर घटनेतील पीडितेच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवणाऱ्या तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुणीने इन्स्टाग्रामवर चुकीची माहिती पसरवली होती. या तरुणीला सोशल मीडियावर साडेपाच लाख फॉलोअर्स आहेत.

बदलापुरात शाळेत साडेतीन वर्षांच्या चिमुकलींवर अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. तसेच या घटनेवरुन बदलापुरात मोठा राडा झालेला बघायला मिळाला. घटनेचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांनी थेट बदलापूर रेल्वे स्टेशनचं कामकाज ठप्प केलं होतं. आंदोलकांनी दिवसभर रेल्वे ठप्प करुन ठेवली होती. अखेर संध्याकाळी पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला होता. या घटनेनंतर सोशल मीडियावर चुकीची माहिती आणि अफवा पसरवलं जात असल्याचा पोलिसांच्या लक्षात आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

VIREL NEWS

बदलापूर येथील अल्पवयीन पीडितेच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या प्रकृतीविषयी चुकीची आणि गैरसमज पसरवणारे मेसेजेस सोशल मीडियावरून पसरवले जात होते, असं पोलिसांच्या लक्षात आलं. या प्रकरणी चुकीची माहिती पसरवून समाजामध्ये असंतोष पसरवणाऱ्या व्यक्तीचा ठाणे आयुक्तालयातील सायबर सेलने तांत्रिक पद्धतीने शोध घेतला आहे.

बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणात एका 21 वर्षीय तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संबंधित तरुणी अंबरनाथ येथे वास्तव्यास आहे. या तरुणीवर अफवा पसरवून समाजात अशांतता पसरवण्याच्या संदर्भाचा गुन्हा बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

संबंधित तरुणीचे इन्स्टाग्रामवर साडेपाच लाख फॉलोअर्स असल्याने तिने शेयर केलेली पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. याप्रकरणी कोणीही कोणत्याही स्वरुपात अफवा पसरवू नयेत आणि कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आलं आहे.

Leave a Comment