Gautami Patil Dance Video : देवमाणूस मालिकेत तडफदार लावणी सादर होणार, कातिल गौतमी देवमाणसाचा काटा काढणार?
Gautami Patil Dance Video : नृत्यांगणा गौतमी पाटील हिने काही दिवसांपूर्वी ‘देवमाणूस’ या झी मराठीवरील मालिकेत एन्ट्री घेतली आहे. (Gautami Patil Dance Video) दरम्यान, गौतमीने मालिकेत एन्ट्री घेताच संपूर्ण महाराष्ट्रात या मालिकेची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. गौतमी पाटील (Gautami Patil Dance Video) मालिकेतील आण्णा नाईक यांच्यासोबत थिरकताना दिसली आहे. तर अजित कुमार गौतमीच्या ब्लाऊजचं माप घेताना पाहायला मिळला आहे. (Gautami Patil Dance Video)
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तडफदार लावणी सादर होणार, कातिल गौतमी देवमाणसाचा काटा काढणार?
दरम्यान, आता गौतमी पाटील देवमाणूस’ या झी मराठीवरील मालिकेत लावणी सादर करताना पाहायला मिळणार आहे. झी मराठीने गौतमीच्या गावातील डान्सचा शॉर्ट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अजित कुमार हा डान्स स्टेजच्या समोर उभारुन पाहाताना दिसतोय, तर आण्णा नाईक हे गौतमीसोबत डान्स करताना पाहायला मिळत आहेत. झी मराठीने हा व्हिडीओ शेअर करताना ‘तडफदार लावणी सादर होणार,कातिल गौतमी देवमाणसाचा काटा काढणार?’, अशा आशयाचं कॅप्शन दिलंय.
गौतमी पाटीलच्या तालावर संपूर्ण गाव नाचणार
दरम्यान, गौतमी पाटीलच्या देवमाणूसमधील डान्सवर म्हणजेच तिच्या तालावर संपूर्ण गाव नाचणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. शिवाय गौतमी देवमाणसाचा गेम करणार? असंही झी मराठीने शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय. त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार? हे पाहाण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
गौतमी पाटील हिने यापूर्वी देवमाणूस मालिकेतील आण्णा नाईक यांच्या बरोबर ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यावर डान्स केला होता. तिचा डान्स देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता ती मालिकेत संपूर्ण गावासमोर डान्स करताना पाहायला मिळणार आहे. याशिवाय गौतमीने देव मालिकेतील सरु आजीबरोबर देखील डान्स केला होता. त्यामुळे गौतमीच्या देवमाणूसमधील मालिकेमुळे ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. प्रेक्षकांनी या मालिकेला पुन्हा एकदा प्रचंड प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे.