Python Attack Video : राजस्थानातील कोटा ‘कोचिंग सिटी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शहरात पुन्हा एकदा जंगली प्राण्यांचा उच्छाद वाढताना दिसत आहे. सोमवारी सायंकाळी कोटा सुपर थर्मल पॉवर प्लांटमध्ये घडलेल्या एका धक्कादायक प्रसंगाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. रोजच्या प्रमाणे काम सुरू असताना एका प्रचंड अजगराने एका कर्मचाऱ्यावर भीषण हल्ला केला. या घटनेचा थरारक व्हिडीओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंद सिंग नावाचे कर्मचारी रोजच्या कामात व्यस्त असतानाच झुडपांतून अचानक बाहेर आलेल्या अजगराने त्यांच्यावर झडप टाकली. क्षणात त्या अजगराने नंद सिंग यांच्या कंबरेभोवती आणि शरीराभोवती घट्ट पकड घेतली. अचानक झालेल्या या हल्ल्याने नंद सिंग घाबरून आरडाओरड करू लागले. त्यांचे ओरडण्याचे आवाज ऐकून जवळ काम करणारे इतर कामगार धावत आले.
अजगराने पूर्ण ताकदीने नंद सिंग यांना वेढलेलं पाहून कामगार क्षणभर हादरलेच, पण त्यांनीही जीवावर उदार होत बचावकार्य सुरू केले. काहींनी लाकडी दांडक्यांनी अजगराला दूर करण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी नंद सिंग यांना ओढून काढण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ काही मिनिटे चाललेल्या या संघर्षानंतर अखेर त्यांनी नंद सिंग यांना अजगराच्या विळख्यातून सुखरूप बाहेर काढलं. घटनेदरम्यान अजगरावर दांडक्यांनी मारा करण्यात आला, मात्र तो आक्रमक अवस्थेतच होता. कामगारांनी तत्परता दाखवली नसती तर हा प्रसंग अधिक भीषण वळण घेऊ शकला असता Python Attack Video.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
स्थानिक कामगारांनी सांगितले की, घटनेची माहिती प्लांट प्रशासनाला देण्यात आली होती. पण, त्यानंतरही ना वनविभागाला कळवण्यात आले, ना सुरक्षा रक्षक तातडीने घटनास्थळी पोहोचले. या दुर्लक्षामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे. “अशा प्रकारच्या अपघातात काहीही होऊ शकतं… पण, तरीही मदतीसाठी कुणीच नाही आले,” अशी खंत कामगारांनी व्यक्त केली आहे.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये नंद सिंग अजूनही हादरलेले, घाबरलेले दिसतात. त्यांच्याभोवती अजगराची घट्ट पकड आणि मदतीसाठी धडपडणारे कामगार हे दृश्य पाहून अंगावर काटा येतो. जर कामगारांनी काही क्षण उशीर केला असता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली आहे. आता या प्रसंगानंतर पॉवर प्लांटमधील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत Python Attack Video.