बँक ऑफ बडोदा देईल 10 लाखापर्यंत कर्ज! वाचा या कर्ज योजनेची ए टू झेड माहिती

bank of baroda mudra loan :- अनेकांना स्वतःचा व्यवसाय उभा करायचा असतो. परंतु व्यवसायासाठी लागणारा पैसा बऱ्याच जणांकडे उपलब्ध नसतो. त्यामुळे व्यवसाय करण्याची इच्छा असताना देखील बऱ्याच व्यक्तींना व्यवसाय उभारता येत नाही. याकरिता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून व्यवसाय उभारणी करिता आर्थिक मदत होईल यासाठी अनेक योजना राबवण्यात येतात.

 

बँक ऑफ बडोदा कडून मिळणार 10 लाख रुपये

असा करा ऑनलाईन अर्ज

 

एवढेच नाही तर बँकांच्या माध्यमातून देखील व्यवसाय उभारणीसाठी कर्ज दिले जाते. यामध्ये जर आपण बँक ऑफ बडोदा चा विचार केला तर बँक ऑफ बडोदा ही बँक ही मुद्रा कर्जाच्या स्वरूपात  लहान व्यवसायांना आर्थिक पुरवठा करण्यासाठी ई मुद्रा योजनेच्या माध्यमातून मदत करते. मुद्रा लोन हे लहान व्यवसायांसाठी  महत्वाचे असे कर्जाचे स्वरूप असून लहान व्यवसायिकांना त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक करता यावी याकरिता आवश्यक निधी या माध्यमातून उपलब्ध होतो व व्यवसाय वाढण्यास व त्याचा विस्तार करण्यास व्यावसायिकांना मदत होते.

 

प्रामुख्याने ई मुद्रा लोन हे उत्पादन, सेवा तसेच व्यापार आणि कृषी यासह विविध क्षेत्रातील व्यवसायांकरिता कर्ज उपलब्ध करून देते. व्यवसायामध्ये यंत्रसामग्री पासून तर खेळते भांडवल, व्यवसायासाठी लागणारे आवश्यक उपकरणाची खरेदी तसेच व्यवसायाचा विस्तार आणि विकास इत्यादी संबंधित खर्चाकरिता हे कर्ज खूप फायद्याचे ठरू शकते.

Leave a Comment