MIDC मध्ये जायचं म्हणून भाडं मिळालं, तो सोडायला गेला, पण तिथे मृत्यू त्याची वाट पाहात बसला होता याची कल्पनाही नव्हती. प्रवासी रिक्षातून उतरला आणि 12 सेकंदाचा अवकाश होत्याचं नव्हतं झालं.
12 सेकंदानं घात केला आणि रिक्षावर झाडाची फांदी कोसळली. या दुर्घटनेत रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.
ही धक्कादायक घटना डोंबिवलीतल्या एमआयडीसी परिसरात ही घटना घडलीय. ही व्यक्ती रिक्षानं डोंबिवलीतल्या एमआयडीसी परिसरात घडली. यावेळी रिक्षातून प्रवासी व्यक्ती खाली उतरला आणि बाजूला असलेलं झाड या रिक्षावर जाऊन कोसळलं.
अवघ्या अठरा सेकंदाच्या फरकानं या व्यक्तीचा जीव वाचलाय. हा व्यक्ती रिक्षातून उतरून आत गेला आणि झाड थेट रिक्षावर जाऊन कोसळलं. या घटनेत रिक्षाचालकाचा मात्र मृत्यू झाला. रामदीन लोद असं या रिक्षा चालकाचं नाव आहे.
हे झाड नेमकं कसं कोसळलं? कोणी फांदी तोडत होतं का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. झाड कोसळून रिक्षा चालकाचा दुर्देवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या रिक्षा चालकाला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र त्याचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.