Maharashtra IMD Report : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड बदल झाल्याचे जाणवत आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याने निरोप घेतला असला तरी राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कायम आहे.
Maharashtra IMD Report : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड बदल झाल्याचे जाणवत आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याने निरोप घेतला असला तरी राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कायम आहे. अशावेळी आजही (19 ऑक्टोबर) राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. (maharashtra weather forecast rain alert to these districts october heat IMD report today 19 october 2024 mumbai pune)
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांसह पाऊस कोसळू शकतो. तर मराठवाड्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
त्याचवेळी, विदर्भातील काही भागात हलका पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती या जिल्ह्यांत ऑक्टोबर हीट जास्त प्रमाणात जाणवणार आहे. त्याचबरोबर उर्वरित वर्धा, गडचिरोली, बुलढाणा, वाशिम, भंडारा, गोंदिया, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये सुद्धा वातावरण कोरडे राहून तापमान वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईत हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबई शहर आणि उपनगरात आज वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. यासह या ठिकाणी किमान तापमान 27.99 अंश सेल्सियस राहील. तर कमाल तापमान 28.45 अंश सेल्सियसपर्यंत असण्याची शक्यता आहे.