Ladki Bahin Yojana April Installment: महाराष्ट्र सरकारची महिलांसाठी असलेली महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत एप्रिल 2025 चा हप्ता (Ladki Bahin Yojana, April 2025 Installment) लवकरच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पात्र महिलांना ₹1,500 इतकी आर्थिक मदत एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. खास करुन हा दिवस अक्षय्यतृतीयेचा असू शकतो. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरु करण्यात आलेली ही योजना 21 ते 60 वयोगटातील महिलांना ₹1,500 मासिक आर्थिक मदत प्रदान करते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत नसाव्यात, तसेच योजना अंतर्गत सामाजिक व आर्थिक निकष पूर्ण केलेले असावेत.
एप्रिल 2025 हप्ता कधी येणार?
सरकारने अद्याप नेमकी तारीख जाहीर केलेली नसली, तरी महिला व बाल विकास विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना एप्रिल 25 ते एप्रिल 30 या कालावधीत हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. लाभार्थ्यांनी बँक खाते आणि अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावे तसेच एसएमएस अलर्ट्सद्वारे माहिती तपासावी.
- लाभार्थी महिला21 ते 60 वर्षे वयोगटातील असाव्यात.
- त्या महाराष्ट्रातील रहिवासी असाव्यात
- शासकीय/निमशासकीय नोकरीत नसाव्यात
- इतर कोणत्याही शासकीय योजनेंतर्गत आर्थिक लाभ घेत नसावेत.(घेत असल्यास ₹1,500 पर्यंतची रक्कम या योजनेतून भरून दिली जाते)उदाहरणार्थ, ज्या महिलांना Namo Shetkari Samman Yojana अंतर्गत ₹1,000 मिळते, त्यांना लाडकी बहिण योजनेतून ₹500 अतिरिक्त रक्कम दिली जात आहे.
पैसे जमा झाले की नाही, कशी तपासाल स्थिती?
महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
लाडकी बहीण योजना पेमेंट स्टेटस या पर्यायावर क्लिक करा
आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल नंबर टाका
आपल्या एप्रिल हप्त्याची स्थिती तपासा
मंत्री अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
या आठवड्यात, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, लाभात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. सरकार सर्व पात्र महिलांना पूर्ण लाभ वेळेवर मिळेल याची काळजी घेत आहे, असेही त्यांनी सांगितले. लाभार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत स्रोतांवर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केलेली एक कल्याणकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत, पात्र महिलांना त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य आणि पोषणाला पाठिंबा देण्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे दरमहा ₹1,500 मिळतात.