Ladki Bahin Yojana ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट! ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार एप्रिल महिन्याचा हफ्ता

Ladki Bahin Yojana : गेल्या शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली. जून 2024 मध्ये या योजनेची सुरुवात झाली आणि या अंतर्गत पहिला हप्ता जुलै महिन्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला.

या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ महिलांच्या खात्यात जमा होतोय. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च 2025 या नऊ महिन्यांचा लाभ मिळाला आहे.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता गेल्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला.

दरम्यान आता या योजनेच्या पात्र महिलांच्या माध्यमातून या योजनेचा पुढील एप्रिल महिन्याचा हप्ता कधीपर्यंत खात्यात जमा होणार अशी विचारणा होताना दिसत आहे. याच संदर्भात आता एक महत्त्वाची माहिती सुद्धा समोर आली आहे.

एप्रिल महिन्याचा लाभ कधी मिळणार ?

मार्च 2025 मध्ये फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा लाभ पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये 8 मार्चपासून जमा होण्यास सुरुवात झाली आणि दहा ते बारा मार्च दरम्यान सर्वच महिलांना या योजनेच्या दोन्ही हफ्त्याचे पैसे मिळाले.

आता या योजनेच्या पात्र महिलांना एप्रिल महिन्याचा लाभ देखील लवकरच मिळणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देण्यात आला होता. 7 एप्रिल पासून हे पैसे देण्यास सुरुवात झाली होती.

त्यामुळे आता एप्रिल महिन्याचा हप्ताही 7-8 तारखेला मिळणार का असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. महिला दिनाचे औचित्य साधून फेब्रुवारी-मार्च महिन्याच्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींना देण्यात आले होते.

यामुळे आता या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता देखील सात तारखेपासून पात्र महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये होतोय. सात ते आठ एप्रिल दरम्यान या योजनेचे पंधराशे रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

मात्र या संदर्भात अजून तरी शासनाकडून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे याचा एप्रिल महिन्याचा लाभ आज किंवा उद्याला खात्यात जमा होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Leave a Comment