Raja Raghuvanshi New CCTV Viral : इंदौरचा रहिवासी असलेल्या राजा रघुवंशीच्या हत्येचे गूढ उकलले आहे, परंतु तपास अजूनही सुरू आहे. या प्रकरणात सतत अनेक नवीन खुलासे होत आहेत. सुरुवातीच्या तपासात सोनमचे प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले असले तरी, पोलिसांना ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी सर्व संभाव्य कारणे तपासायची आहेत. दरम्यान, आता राजा रघुवंशीचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे.
इंदौरमधील व्यापारी राजा रघुवंशी हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असून अनेक नवीन दुवे जोडले जात आहेत. याप्रकरणात राजाची पत्नी सोनम हिच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली असून आरोपींनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे. तरीही पोलीस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान, राजाचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राजा इंदौरहून शिलाँगला निघाला तेव्हाचा हा व्हिडीओ असल्याचे समजते.
घरातून बाहेर पडताना राजा जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. राजा हा शिलाँगला जाण्यापूर्वी त्याचे हे फुटेज असल्याचे बोलले जात असूव यामध्ये तो रॅपिडो बाईकवर बसताना दिसतो. तो एक सूटेकस घेऊन बाहेर आला आणि रॅपिडो बाईकवर बसला.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, ही तीच सुटकेस आहे जी हत्येच्या तपासादरम्यान शिलाँग हॉटेलमध्ये सापडली होती. व्हारल झालेल्या या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये राजाला गेटवर सोडायला कोणीही आलेलं दिसलं नाही. एवढच नव्हे तर राजाची पत्नी सोनम देखील त्याच्या जवळपास कुठेही दिसली नाही. राजाच्या हत्येपूर्वीचं हे शेवटचं फुटेज आहे, अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे. मात्र Tv9 या व्हिडीओच्या सतत्येची पुष्टी करत नाही.



5 आरोपींना अटक
23 मे रोजी शिलाँगच्या डोंगरावर पत्नी सोनमने तीन आरोपींसह राजाची हत्या केली. या हत्येचा सूत्रधार सोनमचा प्रियकर राज कुशवाह आहे. म्हणजेच या प्रकरणात एकूण 5 आरोपी आहेत. तर, राजाच्या भावाने असा दावा केला आहे की, या प्रकरणात आणखी तीन नावं पुढे येऊ शकतात. मात्र, त्याने अद्यापही त्या तिघांची नावं उघड केलेली नाहीत. राजाचा भाऊ सचिनने सोनमवर तांत्रिक विधी केल्याचा आणि मानवी बलिदान दिल्याचा आरोपही केला आहे.
कोर्टात हजर होणार 2 साक्षीदार
दरम्यान, मेघालय पोलिसांचे म्हणणे आहे की ते केवळ प्रेमाच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर ज्या सर्व दृष्टिकोनातूनही गुन्ह्याचा तपास करत आहेत. पोलिसांनी क्राइम सीन रीक्रिएटही केला. यासोबतच, गुन्हा केल्यानंतर हत्येचे आरोपी ज्या राज्यांमध्ये गेले होते त्या राज्यांच्या पोलिसांचीही मदत मागण्यात आली आहे. या खून प्रकरणात पूर्ण पुरावे हाती आले आहेत, फक्त नेमके दुवे जोडणे बाकी आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे. या प्रकरणात आता सोनमच्या पालकांना न्यायालयात साक्षीदार म्हणून हजर केले जाईल. जर त्याची बहीण दोषी सिद्ध झाली तर तिला शिक्षा मिळेल यासाठी स्वतः प्रयत्न करेल, असे सोनमच्या भावाने आधीच सांगितलं होतं.