कृष्णा आंधळे जिवंत नाहीये, त्याची हत्या झालीये’; आव्हाड मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल काय बोलून गेले? Jitendra Awhad Dhananjay Munde News

Jitendra Awhad Dhananjay Munde News: “महाराष्ट्र पेटेल म्हटल्यावर धनंजय मुंडेंना जबरदस्ती राजीनामा द्यायला लावला, नाहीतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नसता”, असे सांगत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आरोपी कृष्णा आंधळे याच्याबद्दल खळबळजनक दावा केला आहे.

कृष्णा आंधळे जिवंतं नाहीये, असे आव्हाडांनी विधानभवन परिसरात सांगितले.

जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर महायुती सरकारवर टीका केली. सरकारकडे हे फोटो होते, तरीही धनंजय मुंडेंना लपवण्याचे काम सरकार करत होते, असे ते म्हणाले.

…मग सरकार इतकं निर्दयी आहे?

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “नागपूरच्या अधिवेशनात या सगळ्या घटनेचं वर्णन मी केलं होतं. या फोटोतील सगळं वर्णन माझ्या भाषणात होतं. संतोष देशमुखांच्या अंगावर लघुशंका करण्यात आली, हे देखील मी विधानसभेत सांगितलं होतं. सरकारला प्रश्न विचारायचा की, ९० दिवसांपासून हे सगळे फोटो तुमच्या ताब्यात होते. माहिती सरकारला होती, मग सरकार इतकं निर्दयी आहे? इतकी सगळी माहिती असतानाही धनंजय मुंडेंना लपवण्याचे काम करत होते.”

धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नसता -आव्हाड

“नैतिकता… हे फोटो काय दाखवत होते. या फोटोतून उद्रेक होईल. महाराष्ट्र पेटेल म्हटल्यावर धनंजय मुंडेंना जबरदस्ती राजीनामा द्यायला लावला. नाहीतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नसता”, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.

‘कृष्णा आंधळे जिवंत नाहीये…’

आता महादेव मुंडेंची बायको उपोषणाला बसली आहे. तिला तरी न्याय द्या. रामकृष्ण बांगरांना न्याय द्या. किशोर फडच्या आईवडिलांना बोलवून घ्या, त्याला न्याय द्या. बापू आंधळेच्या हत्या प्रकरणात न्याय द्या. मी अशा १५ हत्या प्रकरण संध्याकाळपर्यंत देतो आणि सरकारला आवाहन करतो की, तुम्ही हे गुन्हे दाखल करा आणि न्याय द्या. कृष्णा आंधळे जिवंत नाही, त्याची हत्या झालेली आहे”, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.

Leave a Comment