IMD Monsoon Forecast : आत उरले फक्त काही तास; महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, आयएमडीचा हायअलर्ट

महाराष्ट्रात आता ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवू लागला आहे, पावसानं उघडीप दिल्यानं काही भागांमध्ये तापमानात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात आता ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवू लागला आहे, पावसानं उघडीप दिल्यानं काही भागांमध्ये तापमानात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आयएमडीकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईबाबत बोलायचं झाल्यास मुंबईमध्ये पुढील 24 तास ढगाळ वातावरण राहणार असून, काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो.

हवामान विभागाकडून आज ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

दरम्यान पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असणार आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस सुरूच आहे.

 

Leave a Comment