Crime News भोंदूबाबाने हद्द केली; अल्पवयीन मुलीसोबत केले नको ते कृत्य. गुन्हा दाखल

Crime News

Crime News | कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले येथे एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. राजू उर्फ राजाराम तावडे या भोंदू बाबाने एका अल्पवयीन मुलीवर जादूटोण्याच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केला.

या प्रकरणी पोलिसांनी तावडे याला अटक केली आहे.

भोंदू बाबाने पीडित मुलीच्या कुटुंबाला तिला नोकरी लावण्याचे आमिष दाखवले आणि आर्थिक मदतीचे आश्वासन दिले. त्यावर विश्वास ठेवून कुटुंबीयांनी मुलीला त्याच्याकडे पाठवले. मात्र, या विश्वासाचा गैरफायदा घेत तावडे याने तंत्र-मंत्र आणि जादूटोण्याच्या नावाखाली अत्याचार केला, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

 

 

या गंभीर प्रकरणात ( Crime News) फक्त तावडेच नाही, तर सुप्रिया पवार नावाची एजंट महिला आणि मनोज सावंत या वाहनचालकाचाही सहभाग असल्याचं उघड झालं आहे. या तिघांवर पॉक्सो कायद्यानुसार (POCSO) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

या प्रकारामुळे स्थानिकांत संतापाचं वातावरण असून, पोलिस प्रशासनाकडून कडक कारवाईची मागणी होत आहे. अल्पवयीन मुलींविरोधात होणाऱ्या अशा अमानवी कृत्यांना आळा बसण्यासाठी कठोर शिक्षा आवश्यक असल्याचा सूर नागरिकांतून उमटतोय.

Leave a Comment