PM Modi AC Yojana
दे शभरात उष्णतेची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे, ज्यामुळे एसीची मागणी झपाट्याने वाढत आहे. सरकार आता एक योजना आणली आहे. ज्यामध्ये जुने आणि अधिक वीज खपवणारे एसी बदलून ५-स्टार रेटिंग असलेले नवीन एसी घेतल्यास नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
पीएम मोदी एसी योजना 2025′ म्हणजे काय?
उष्णतेचा वाढता स्तर लक्षात घेऊन, वीज वापर कमी करण्यासाठी आणि वीज ग्रीडवरील ताण कमी करण्यासाठी सरकार एक नवीन योजना आणत आहे. या योजनेच्या अंतर्गत नागरिकांनी त्यांचे जुने, जास्त वीजेचा वापर करणारे एसी रीसायकल करून नवीन 5-स्टार रेटेड एसी खरेदी करावेत, अशी योजना आहे.
अशी होणार बचत?
- वीज बिलात बचत: नवीन 5-स्टार एसी घेतल्यास वार्षिक सुमारे ₹6300 पर्यंत वीज बिलात बचत होऊ शकते.
- रीसायकल सर्टिफिकेटद्वारे सवलत: जुना एसी अधिकृत रीसायकल सेंटरमध्ये दिल्यास, सर्टिफिकेट मिळेल ज्याच्या आधारे नवीन एसीवर सवलत मिळू शकते.
- ब्रँडेड एसीवर डिस्काउंट: Blue Star, Voltas, LG सारख्या ब्रँडकडून नवीन एसी खरेदी करताना विशेष सवलती मिळू शकतात.
- वीज वितरण कंपन्यांकडून सवलत: नवीन 5-स्टार एसी खरेदी करणाऱ्यांना वीज वितरण कंपन्यांच्या सहकार्याने वीज बिलातही सवलत मिळण्याची शक्यता आहे.
ही योजना कोण तयार करत आहे?
या योजनेची तयारी ऊर्जा मंत्रालय आणि Bureau of Energy Efficiency करत आहे. ही योजना India Cooling Action Plan शी सुसंगत ठेवण्यात येत आहे.
Ministry of Power
@MinOfPower
AC के लिए 24 डिग्री टेंप्रेचर काफी है। इससे बिजली की बचत तो होगी ही, बिजली बिल के खर्चे में भी कमी आएगी। इसलिए AC को 24 डिग्री में रखें तथा ऊर्जा संरक्षण में योगदान दें। #24HaiKaafiHai #SaveEnergy #EnergyEfficiency #5StarAC
23
Reply
Copy link
BSES दिल्ली AC रिप्लेसमेंट योजना
अशीच योजना सध्या दिल्लीमध्ये कार्यरत आहे. BSES च्या योजनेनुसार, जुना 3-स्टार रेटेड एसी दिल्यानंतर नवीन 5-स्टार रेटेड एसीवर 60% पर्यंत सवलत दिली जात आहे. मात्र, जुन्या एसीची स्थिती चालू (वर्किंग कंडिशन) असावी आणि एका ग्राहक क्रमांकावर जास्तीत जास्त 3 युनिट्स बदलता येऊ शकतात.
जसजशी हवामान बदलाची गती वाढत आहे, तसतशी भारतातील उन्हाळ्याची तीव्रताही वाढत आहे. त्याचबरोबर, देशाभरात थंडावा देणाऱ्या उपकरणांची मागणीही वेगाने वाढते आहे. विशेषतः वातानुकूलित यंत्रणेची (AC) विक्री गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली आहे.
वीज वापरावर मोठा ताण
2021-22 मध्ये जिथे सुमारे 84 लाख AC विकले गेले, तेच 2023-24 मध्ये 1.1 कोटींवर पोहोचले आहेत. ही वाढ एकीकडे आरामदायी वातावरण देते असली तरी दुसरीकडे वीज वापरावर मोठा ताण आणते आणि वीज ग्रीडवरचा दबाव वाढवते.