Video Viral: गवत चरताना गाईसमोर अचानक आला कोब्रा, फणा काढून उभा राहिला मग गाईने जे केले. पाहून दंग व्हाल

सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला थक्क करतात तर कधी आपल्याला आश्चर्याचा धक्का देऊन जातात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यात गावात चरत असलेल्या गाईवर कोब्राने हल्ला केल्याचे दिसून येत आहे. मात्र यानंतर गाय जे करते ते पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

गाय आणि कोब्राचा हा व्हिडिओ इतका अनोखा आहे की इंटरनेट पब्लिक तो पाहिल्यानंतर आता हैराण झाले आहे. असे घडू शकते यावर त्यांचा विश्वास बसत नाही. व्हिडिओमध्ये काय आहे याबाबत बोलणे केले तर, यात एका शेतात गाय गवत चरताना दिसत आहे. तेवढ्यात तिथे गावातामागून एक किंग कोब्रा गाईच्या समोर येऊन फणा पसरवून उभा राहतो. हे दृश्य पाहून अनेकांना असे वाटते की आता हा कोब्रा गायीला डंक मारेल किंवा गाय घाबरेल मात्र सत्य परिस्थितीत असे काहीच होत नाही. गाय कोब्राला पाहून अजिबात घाबरत नाही तर दुसऱ्याच क्षणी आपल्या जिभेने कोब्राला चाटू लागते.

हा व्हिडीओ पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत. हा व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. हा व्हिडिओ केवळ 17 सेकंदांचा आहे, ज्यामध्ये आपण शेतात गाय चरताना पाहू शकतो. अचानक एक कोब्रा साप फणा पसरवून त्याच्या समोर उभा राहतो. पण जेव्हा गाय घाबरून पळून जाण्याऐवजी प्रेमाने चाटायला लागते तेव्हा आश्चर्यचकित होते. तर सापही हल्ला करत नाही आणि तिथेच उभा राहतो. हे सर्व दृश्य पाहून आता अनेकजण हादरले आहेत.
The interest this cow has for this snake

[📹 murluwala.sapera]pic.twitter.com/Xb7mqkSF1w

— Massimo (@Rainmaker1973) October 11, 2024

हा व्हायरल व्हिडिओ @Rainmaker1973 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, या गाईला या सापाबद्दल स्वारस्य आहे असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेक युजरने कमेंट्स करत या व्हिडिओवर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “आयुष्यात पहिल्यांदाच सापाला कशाची भीती वाटते ते पाहिले त्याने प्रहार करण्याचाही प्रयत्नही केला नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, ” त्या गाईला सापाविषयी आपुलकी आहे”.

Leave a Comment