EKNATH-SHINDE-
पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.
पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. मात्र या निवडणुका युती म्हणून लढवल्या जाणार की स्वबळाची चाचपणी होणार? याबाबत आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे नाशिक महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे, नाशिक महानगरपालिका निवडणूक शिवसेना युतीमध्येच लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानात बोलत होते.
नेमकं काय म्हणाले उदय सामंत?
नाशिक महानगरपालिका निवडणूक शिवसेना युतीमध्येच लढणार आहे, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन मी तुमच्यापर्यंत आलो आहे. निवडणुकीचा सर्व निर्णय मंत्री दादा भुसे हे घेतील, त्यामुळे इतर कोणीही प्रतिक्रिया देऊ नये, अशा सूचना यावेळी उदय सामंत यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, नाशिक महानगरपालिकेत महायुतीचाच महापौर होणार. तुम्ही जी कामं केली आहेत, ती लोकांना घरोघरी जाऊन सांगा, कोणी काहीही घोषणा करू द्या त्यावर तुम्ही प्रतिक्रिया देऊ नका, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. दरम्यान सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका जिंकण्याचा निर्धार महायुतीकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आता या सर्व पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत.
दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटासंदर्भात देखील मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युती करण्याची पक्षाची तयारी असल्याची माहिती समोर येत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पर्याय देखील युतीसाठी खुला असणार आहे. मात्र अद्याप या निवडणुकीसंदर्भात युतीबाबत महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याची माहिती देखील समोर येत आहे.
– नाशिक महापालिकेत भाजपकडून 100 पारचा नारा… – पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना… –