Weather Alert today 05/06/2025 : राज्यात गुरुवारचा दिवस वादळी पावसाचा, 26 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

Weather Alert today 05/06/2025

4 जून पासून राज्यातील विविध भागांत पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 5 जून रोजी राज्यातील 26 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मे महिन्यात राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस झाल्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीला काही भागात पावसाने थोडी विश्रांती घेतली. मात्र आता 4 जून पासून राज्यातील विविध भागांत पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 5 जून रोजी राज्यातील 26 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पाहुयात 5 जून रोजी राज्यात कोणकोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

कोकण विभागातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांत 5 जून रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, पुणे घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये 5 जून रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर धाराशिव या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या दोन्ही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये अंशतः ढगाळ आकाश आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक, नाशिक घाटमाथा, धुळे, जळगाव, अहिल्या नगर या जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ आकाश आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह, विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यातील पालघर, सिंधुदुर्ग, नंदुरबार, कोल्हापूर घाटमाथा कोल्हापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये 5 जून रोजी पावसाची शक्यता नाही. हवामान कोरडे आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे.

राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने वादळी वाऱ्यांमुळे झाडे आणि विद्युत तारांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. विजांचा कडकडाट होत असल्यास सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे करावीत, अशा सूचना हवामान विभागाकडून देण्यात येत आहे.

Leave a Comment