Uran Flood: उरणमध्ये पावसाचा हाहाकार; कार,बाईक बुडाल्या,भयंकर VIDEO

Uran Flood

रायगड: राज्यात आज पुन्हा पावसाने जोर धरला असून रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये धुडगूस घातला आहे. आज अचानक सुरू झालेल्या पावसाने रायगड जिल्ह्यातील काही भागात लोकांची दैना उडवली आहे.

पहा येथे क्लिक करून व्हिडिओ

सहा दिवसांच्‍या विश्रांतीनंतर आज रायगड जिल्‍हयात पुन्‍हा एकदा हजेरी लावली आहे. अलिबागसह उरण, माणगाव, नागोठणे, पाली, म्‍हसळा, श्रीवर्धन, मुरूड भागात दुपारी मध्‍यम स्‍वरूपाचा पाऊस बरसायला सुरूवात झाली.

काही भागात ढगांचा गडगडाट आणि वीजांचा कडकडाट सुरू आहे. सकाळी कडक ऊन पडले होते मात्र दुपारी आकाशात काळेकुटट ढग जमा झाले आणि पावसाने बरसायला सुरूवात केली.

मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्‍याने नागरीकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत होता. आजच्‍या पावसाने हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे.

पहा येथे क्लिक करून व्हिडिओ 

Leave a Comment