Rain Update: राज्यात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. मुंबई पुण्यासह राज्याला अवकाळीने पावसाने झोडपले आहे.दरम्यान, पावसाचे हे सावट अद्याप निवळले नसून पुन्हा एकदा राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
यामुळे पुढीचे ४८ तास महत्वाचे असणार आहेत.
राज्यातील कोकण किनारपट्टी भागासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केले आहे. यामुळे इथल्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर येथील समुद्रकिनारी भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देत सावधगिरी म्हणून खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना मासेमारांना देण्यात आल्या आहेत. पुढील 48 तासांमध्ये किनारपट्टी भागांमध्ये सोसाट्याचा वारा वाहणार असून, वाऱ्याचा सरासरी वेग ४० ते ५० किमी ताशी इतका असणार आहे.
Rain Update
फक्त कोकणातच नव्हे राज्यात पुढचे तीन ते चार दिवस मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही हवामान विभागाने केले आहे. राज्याच्या उर्वरित भागांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात २२ मेपर्यंत पावसाळी वातावरण कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले असून त्यानंतर पूर्वमोसमी पाऊस कमी होणार आहे. तर त्यामुळे तापमानात चढ उतार पाहायला मिळणार आहे.
या जिल्ह्यांसाठी अतिदक्षतेचा इशारा
पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग या जिल्ह्यांसाठी पावसाचा अतिदक्षतेचा इशारा देत हवामान विभागाने नागरिकांना सावध केले आहे.
पुण्यात पाऊसचा कहर
काल दुपारपासून रात्रभर झालेल्या अवकाळी पाऊसामुळे पुणेकरांची चांगलीच दाणादाण उडाली. दुपारी सुरू झालेल्या पाऊसाने आज सकाळी विश्रांती घेतली आहे. मात्र, काल झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळीने पुण्यात अनेक भागातील रस्त्यावर पाऊसाचे पाणी साचले होते. काही ठिकाणी झाडपाडीची घटना देखील घडल्या आहेत. अचानक आलेल्या जोरदार पाऊसामुळे स्वारगेट परिसरातील वीजपुरवठा काही काळ सुरक्षेच्या कारणास्तव खंडीत करण्यात आला होता. जोरदार पावसामुळे रस्त्यावरून जाणऱ्या वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी देखील झाली होती.