मोठी बातमी! मान्सून महाराष्ट्रात दाखल, पावसाचं प्रमाण कसं असणार? सर्वात मोठी अपडेट

Monsoon-coming in maharashtra

मान्सूनबाबत सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. यंदा तब्बल 12 दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.

मान्सूनबाबत सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. यंदा तब्बल 12 दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आनंदाचं वातावरण आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे, यंदा तब्बल 12 दिवस आधीच मान्सूननं महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. आज राज्याच्या काही भागांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. आठवडाभरापूर्वीच मान्सूनचं अंदमान, निकोबार बेटांवर आगमन झालं होतं. त्यानंतर मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती झाली होती. केरळमध्ये देखील मान्सून वेळे आधीच दाखल झाला होता, त्यानंतर आज मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.

येथे क्लीक करून पहा सविस्तर माहिती 

यंदा पावसाचं प्रमाण कसं असणार?

हवामान विभागानं मोठी अपडेट दिली आहे, राज्यात मान्सून दाखल झाला आहे. यंदा राज्यात पावसाचं प्रमाण कसं असणार याबाबत आधीच हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आला होता. यंदा देशासह राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. यंदा देशात मान्सूनच्या पावसाचं प्रमाण 107  टक्क्यांच्या आसपास राहू शकतं अशी शक्यता आहे.

हवामान विभागाकडून पावसाचा इशारा 

दरम्यान अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे पुढील दोन ते तीन राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये तसेच कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नांदेड, लातूर आणि चंद्रपूर  या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

मुंबईत पावसाला सुरुवात

दरम्यान आज सकाळपासूनच मुंबईतील काही भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. रिमझिम पाऊस सुरू आहे.  तर दुसरीकडे जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. तळकोकणातही जोरदार पाऊस सुरू आहे. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Leave a Comment