Maharashtra Weather Updates
राज्यात मान्सूनच धडाकेबाज आगमन झालेलं आहे. रविवारी रात्रीपासूनच राज्यात अनेक भागांना मान्सूनच्या पहिल्या पावसाने झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. तर मुंबईत देखील या पावसामुळे सखल भागात पाणी साचलेलं बघायला मिळालं.
येथे क्लिक करून पहा
सविस्तर माहिती
यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. त्यानंतर आज देखील हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 3 दिवसांसाठी राज्यातल्या काही भागांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.
राज्यातल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर आणि साताऱ्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर पुणे घाट, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबईला सुद्धा हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच हवामान विभागाकडून हायटाइडचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे.
येथे क्लिक करून पहा
सविस्तर माहिती