Ladki Bahin 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै 2024 पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. सध्या सणासुदीचा काळा आहे. हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यात देण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार आता पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये येण्यास सुरूवात झाली आहे.
सरकार दर महिन्याला 1500 रूपयाचा लाभ देते. त्यानुसार जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर, असे 1500 नुसार पाच महिन्यांचे 7500 महिलांच्या खात्यात 7500 जमा झाले आहेत. महिलांना जुलै आणि ऑगस्ट मधल्या पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम म्हणजेच 3000 रुपये 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आले होते. ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाभ मिळाला नव्हता अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये देण्यात आले होते. त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये महिलांना एकूण 3000 रुपये मिळाले आहेत.
सर्वप्रथम तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ उघडेल. या होम पेजवर तुम्हाला चेक लाभार्थी यादीचा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. तुमच्या डेस्कटॉप स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल, अर्जदाराला विचारलेले सर्व तपशील प्रविष्ट करावे लागतील. सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर अर्जदाराने त्वरीत त्याचे पुनरावलोकन केले पाहिजे आणि त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्यांची यादी उघडेल.
ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे, अशाच महिलांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत. त्यामुळे महिलांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे Aditi Sunil Tatkare Ladki Bahin Yojana.