माझी लाडकी बहीण योजनेचा मे 2025 चा हप्ता खात्यात जमा होणार – नवीन GR जाहीर !

लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अकरावा / 11 वा हप्ता म्हणजेच मे 2025 महिन्याचा आर्थिक लाभ लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.

दिनांक 23 मे 2025 रोजी यासंदर्भातील शासकीय निर्णय (GR) जाहीर करण्यात आला आहे. या जीआरनुसार, पात्र महिलांना मे महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 2025-26 या आर्थिक वर्षातील निधी वितरित करण्यात आला आहे.

निधीची रक्कम किती?

या योजनेसाठी बाब क्रमांक 31 सहायक अनुदान वितरण अंतर्गत एकूण ₹35.70 कोटी (₹33,57.70 लाख) इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. हा निधी संबंधित विभाग प्रमुखांना वितरित करण्यात आला आहे आणि तो लवकरच पात्र बहिणींच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

पुढील अपडेट कधी?

हा निधी कोणत्या दिवशी जमा होईल, ती तारीख जशी ठरवली जाईल तसे आपल्या व्हाट्सअँप ग्रुपवर यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात येईल.

Leave a Comment