Gold price सोने-चांदीच्या दरात होतीये मोठी वाढ; अक्षय्य तृतीयेला सोने होणार सव्वा लाख पार

Gold price:गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सोने यावर्षी अक्षय्य तृतीयेपर्यंत प्रति 10 ग्रॅम एक लाख रुपये दर ओलांडू शकते, असा अंदाज आहे.

सध्या सोन्याचा दर 96000 रुपयांच्या वर गेला आहे. गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेपासून आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 32 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

अनेक देशांमधील तणाव आणि अमेरिकन टॅरिफमुळे सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या मौल्यवान धातूच्या किमतीत यावर्षी प्रचंड वाढ झाली आहे. या वर्षी आतापर्यंत सोने 22 टक्क्यांनी म्हणजेच 17000 रुपयांनी महाग झाले आहे, असेही सांगण्यात आले. 10 मे 2024 रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 73000 रुपये होता. आता तो 96000 रुपयांच्या पुढे गेला आहे. अलीकडच्या काळात डॉलरच्या तुलनेत रुपयामध्येही लक्षणीय सुधारणा झाली आहे. डॉलरवरील दबावामुळे सोन्याच्या किमतीही वाढण्याची अपेक्षा आहे.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे, या महिन्यात किरकोळ व्यापाऱ्यांपासून ते किरकोळ ग्राहकांपर्यंत मोठ्या प्रमाणात खरेदी दिसून येते. अशा परिस्थितीत मागणी वाढल्याने किमती वाढू शकतात. यावर्षी अक्षय्य तृतीया 30 एप्रिल रोजी आहे. त्यामुळे काही दिवसांतच सोन्याच्या दरात वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

24 कॅरेट सोने 9550 रुपये प्रति ग्रॅम

मंगळवारी (दि.15) 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9550 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8754 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7163 रुपये आहे. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 87540 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 95500 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 71630 रुपये आहे. तर चांदीचा भाव प्रति ग्रॅम 99.80 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 99800 रुपये असणार आहे.

Leave a Comment