Emotional Video: हे दृश्य बघून डोळ्यात टचकन पाणी येईल ! म्हाताऱ्या आई-बापानं थांबवलं, पण माजुरडा पोरगा वृद्धाश्रमासमोरील रस्त्यावरच सोडून गेला

Heartbreaking Scene: आई-वडील आपल्या मुलांसाठी आयुष्यभर झटत त्यांच्यावर संस्कार करतात. लहानपणापासूनच आपल्या मुलाचे सर्व स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कष्ट घेतात. मात्र, सध्या एक असं हृदयद्रावक दृश्य समोर आलंय, जे पाहून मन हेलावून जातं.

एका मुलाने गाडीवरून येत थेट आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमासमोर उतरवलं. त्या वयोवृद्ध आई-वडिलांनी रडत रडत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो थांबला नाही

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल (Viral) झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं की, वृद्ध आई-वडीलांना घेऊन त्यांचा मुलगा गाडीवरुन आला. त्यानंतर त्याने त्यांना वृद्धाश्रमाच्या बाहेर वाहन थांबवत वाहनावरुन उतण्यास सांगितले. त्यानंतर वृद्धाश्रमाच्या बाहेर त्यांचे सामान फेकून दिले. आई-वडील मुलाला थांबवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मुलगा त्यांच्या विनवण्या ऐकूनही तेथून निघून जातो. त्यानंतर दोघंही रस्त्यावर पडलेले त्यांचे सामान घेऊन वृद्धाश्रमात जातात. आई-वडिलांच्या डोळ्यातील अश्रू पाहून कोणाचंही काळीज पिळवटून जाईल.

ही घटना नेमकी कुठली आहे ते अद्याप समजले नाही. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून इन्स्टाग्राम, फेसबूक अशा प्लॅटफॉर्मवर शेअर देखील करत आहेत आणि ही संपूर्ण घटना @kamaalrkhan या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेली आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

आपण मोठं झाल्यावर आपल्या आई-(Mother) वडिलांना अशा अवस्थेत टाकणं, हे केवळ संस्कारांचा अपमान नाही, तर माणुसकीलाही काळिमा आहे”असे एका यूजरने म्हटलं आहे तर ”ज्या आईनं आपल्या लेकराला रात्री झोप न लागता झोपवलं, ज्या वडिलांनी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून त्याला शिकवलं, त्याच आई-वडिलांना शेवटी अशा अवस्थेत पाहणं अतिशय दु:खदायक आहे.” असं अनेकांनी म्हटलं आहे”

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Leave a Comment