Dance video : सोशल मीडियावर कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता एका तरुणीचा डान्स खूप व्हायरल होत आहे, ज्यातील तिच्या डान्सचं नेटकरी भरभरून कौतुक करताना दिसत आहेत. सध्या पावसाळा सुरू झाला आहे.
सगळीकडे निसर्गरम्य वातावरणही आहे. अनेकांना पावसाळ्याचा हंगाम आणि त्यात भिजायला खूप आवडते. सोशल मीडियावरही पावसात भिजण्याचा आनंद लुटणाऱ्या अनेकांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच एका तरुणीचा पावसात नाचतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी हिरव्या रंगाची काष्ठी साडी नेसून निसर्गरम्य परिसरात ‘आम्ही ठाकरं ठाकरं या रानाची पाखरं’ या जुन्या मराठी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिच्या भन्नाट डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरीही तिचं कौतुक करताना दिसत आहेत.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावरही खूप चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @nehapatil1507 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “याला बोलतात डान्स” तर दुसऱ्याने लिहिलेय, “स्वर्गीय स्मिता पाटील यांची आठवण करून दिलीत”, तर तिसऱ्याने लिहिलेय, “खूप छान अतिशय सुंदर ताई” Dance video.